पुणेहडपसर

योग्य उपचारांनी कुष्ठरोग बरा होतो . : प्राचार्य दत्तात्रय जाधव

हडपसर ,वार्ताहर .

जीवनातील इतर सर्व संपत्तीपेक्षा आरोग्य ही सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. इतर आजारांप्रमाणेच योग्य वेळी निदान झाले तर कुष्ठरोगसुद्धा पूर्ण बरा होऊ शकतो. कुष्ठरोग झाला म्हणून घाबरून न जाता वेळीच उपचार करावेत.योग्य उपचारांनी कुष्ठरोग बरा होतो असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्ड सचिव प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले. डाॅ.अनिकुमार गौंड यांनी कुष्ठरोग संदर्भात माहिती सांगितली. उपचार कधी आणि कसे घ्यावेत याबाबत मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम व कुष्ठरोग जनजागृती प्रभातफेरी कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्य दत्तात्रय जाधव,उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत,सहाय्यक संचालक आरोग्य विभाग कुष्ठरोग पुणे डाॅ. हुकुमचंद पाटोळे,वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिलकुमार गौंड,कुष्ठरोगतंत्रज्ञ कांताराम तिटकारे,विजयकुमार मुंढे,डाॅ. वर्षा आहेर,डाॅ. चंद्रसेन गिरी, सतिश कोकाटे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर माळवाडी परिसरातून कुष्ठरोग निर्मुलन जनजागृतीपर परभातफेरी काढण्यात आली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कुष्ठरोग प्रतिज्ञा वाचन अनिल वाव्हळ यांनी केले. सूत्रसंचालन रूपाली सोनावळे यांनी केले.तर आभार शिला बोडके यांनी मानले.