पुणे

पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम जोमाने सूरू पुणे जिल्ह्यातील येवत मधील घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…!

पुणे: प्रतिनिधी:( रमेश निकाळजे )

पुरोगामी महाराष्ट्रात पुण्याची ओळख “शिक्षणाचे माहेरघर” अशी आहे, आणी त्याच पुण्यात राजरोसपणे देवाच्या नावाखाली खुलेआम जादूटोणा, अंधश्रध्दा व अघोरी विद्येचा खेळ करून समाजात दहशत पसरवल्या प्रकरणी गावातील भोंदू बाबासह संबंधीतांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी “लहुजी शक्ती सेनेचे” संस्थापक अध्यक्ष शंकर भाऊ तडाखे यांनी पुणे जिल्हाधिकारी व पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सदरील घटना ही येवत जवळील मौजे नाथाचीवाडी, ता. दौड़, जि. पुणे येथे घडली आहे, गावातील माटोबा विद्यालय या शैक्षणिक संकुला जवळ ही घटना घडल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये तसेंच विध्यार्थ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,माटोबा शाळेच्या प्रवेश द्वारासमोर अघोरी विद्या प्रदर्शित करून, खुलेआम दाताने जिवंत प्राण्याचा बळी देऊन समाजात अघोरी विद्धेचा वापर करून दहशत निर्माण करून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम एका भोंदू बाबाने केले आहे, त्यामुळे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रध्दा विरोधी कायद्यांतर्गत संभंदितांवर अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

शैक्षणिक विद्यालय सुरू असताना, मुक्या प्राण्याचा क्रूरपणे बळी घेऊन अंधश्रध्दा पसरवणे व जादूटोणा करणे या बाबी समाजासाठी तसेंच शाळेतील लहान मुलांसाठी घातक असल्याने त्यामुळे भोंदू बाबासह संबंधीतांवर अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यानुसार गुन्हा नोंद करुन योग्य ती कडक कारवाई करावी अशी मागणी लहुजी शक्ती सेना संघटनेच्या वतीने करण्यात आली, पुणे जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी व पुणे ग्रामीण अधीक्षक यांना पत्र देवून कारवाईची मागणी करण्यात आली, सदरील घटनेचा प्रकार हा गंभीर असल्याने ताबडतोप संभंधितांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन उप जिल्हाधिकारी व पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी दिले.