पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमधील शिक्षकेतर सेवक बेमुदत संपावर

हडपसर (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार एस. एम. जोशी कॉलेजमधील एस. ए. परदेशी अधीक्षक , बारवाडे जे. एस.,  वालकोळी एस. आर., सांगळे आर. बी.,  दळवी पी.जी.,गोडे व्ही.जी.,  नायकुले सी.एम., कोलते जी. के., कराडे पी . के., भोसले पी.पी., तळपे एन.ए . काळे एस. जी., महाविद्यालय विकास समितीचे सदस्य

ठाणगे वाय.एस. इत्यादी शिक्षकेतर सेवक बेमुदत संपावर गेले आहेत. आज संपाचा दुसरा दिवस आहे. सेवांतर्गत सुधारित आश्वासित रद्द केलेले निर्णय पूर्ववत करणे,सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार 10, 20, 30 वर्षानंतर लाभाची योजना सुरू करणे, सातवा वेतन आयोग लागू करणे व थकबाकी देणे, 2005 नंतर रुजू झालेल्या सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे अशा प्रमुख मागण्यांसाठी शिक्षकेतर सेवक संपावर गेले आहेत.