पुणे

“पूना स्कूल अँड होम फॉर दि ब्लाइंड बॉईज कोरेगाव पार्क इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न”

हडपसर मेडिकल असोसिएशन व सिध्देश्वर बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पूना स्कूल अँड होम फॉर दि ब्लाइंड बॉईज कोरेगाव पार्क इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तसेच या विद्यार्थ्यांना दहावी बोर्ड परीक्षा साठी जे लेखनिक म्हणून लाभले होते ते ग्यानबा सोपानराव मोझे प्रशालेतील इयत्ता नववीचे विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ पार पाडला.

या कार्यक्रमासाठी डॉ.उमाकाळे,हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सचिन आबणे, मुंढवा पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, डॉ शंतनु जगदाळे, डॉ. स्वप्निल लडकत,आंनदी पवार, पोलिस अधिकारी दिनेश शिंदे, प्राचार्य
यावेळी वाडिया कॉलेज येथील मराठी विभागाच्या डॉ. उमा काळे यांनी मुलांना मार्गदर्शनपर भाषण केले यामध्ये त्या म्हणाल्या की पुढील आयुष्यात तुम्हाला ज्या काही समस्या येतील त्या योग्य प्रकारे हाताळाव्यात त्या साठी सतत वाचन करा योग्य ते शिक्षण तुम्ही पूर्ण करावे त्यासाठी काही गरज लागल्यास महाविद्यालयाशी संपर्क साधावा अशाप्रकारे त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांना व राईटर विद्यार्थ्यांना त्यांनी एक छानसं पुस्तक व भेटवस्तू व रोख रक्कमदिली. तसेच ग्यानबा सोपानराव मोझे प्रशालेचे पर्यवेक्षक मारुती दसगुडे, संजय सुर्वे व कल्याण वाघ उपस्थित होते.

तसेच संत गाडगेमहाराज विद्यालयातील पर्यवेक्षक अजित लेंबे व झेंडेपाटील सर उपस्थित होते. मुख्याध्यापक राजाराम जगताप सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या विद्यार्थी मनोगतात काही विद्यार्थ्यांनी असे म्हणले की आम्ही लहानाचे मोठे शाळेचे झालो आहोत घरापेक्षा जास्त आम्ही शाळेत राहिलो आहोत आम्हाला शाळा सोडून जाण्याची इच्छा होत नाही परंतु पुढील शिक्षणासाठी आम्हाला शाळा सोडून पुढे जावंच लागेल आम्ही शाळेचे नाव नक्कीच उज्वल करू अशी या विद्यार्थ्यांनी ग्वाही दिली.

प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे सर यांनी देखील जे विद्यार्थी दहावी पास होऊन आता बाहेर समाजामध्ये सामान्य महाविद्यालयात मध्ये जाणार आहे त्यांना पुढील आयुष्य सुख-समृद्धीचे आणि अडथळा विरहित होण्यासाठी स्मार्ट केन विद्यार्थ्यांना देऊ केली व या केन चा वापर योग्य ते प्रमाणे करा अशा सूचना देखील शाळेने विद्यार्थ्यांना दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. क्षितिजा रोकडे यांनी केले तर आभार श्री. गणेश पाटील सर यांनी मानले
कार्यक्रमाचे आयोजन डॉ शंतनु जगदाळे यांनी केले.