पुणे

“फोन घेण्यासाठीची घाई,परंतु माणूस जीवाशी जाई”,पाचव्या मजल्यावरून खाली पडून पुण्यात बिल्डरच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू….!

पुणे:प्रतिनिधी:( रमेश निकाळजे )

पुणे : सासवडमधील बांधकाम व्यावसायिक सुनील नाना जगताप यांची २१ वर्षीय मुलगी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून फोन घेण्याच्या घाई गडबडीत तोल जाऊन पडल्याने तिला ताबडतोप जवळील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले परंतु तिची परिस्थिती नाजूक असल्याने तेथील डॉकटरांनी तिला पुणे येथील हॉस्पिटल मध्ये नेण्याचा सल्ला दिला.

परंतु तिचा हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान दुर्देवी अंत झाला असल्यामुळे, या दुःखद घटनेने जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, अनुष्का जगताप (वय २१ वर्ष) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे, मिळालेल्या माहितीनुसार, सुनील जगताप हे सासवड मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत.

२ एप्रिल रोजी ते आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्या नवीन बांधलेल्या इमारतीची पाहणी करण्यासाठी गेले होते, त्यांच्यासोबत अनुष्का देखील गेली होती ,इमारत पाहात असताना फोन आला म्हणून ती गडबडीत खाली येत असताना पाचव्या मजल्यावरून पाय घसरून तोल गेल्यामुळे खाली पडली,व गंभीर जखमी झाली तिला स्थानिक डॉक्टरांच्या सांगण्यावरून उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिचा उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले.