पुणे

पवार साहेबांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवंचैतन्य – प्रशांत जगताप – पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव

०२ मे रोजी “लोक माझे सांगाती” या आत्मचरित्राच्या प्रकाशन प्रसंगी लोकनेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी जाहीर केलेला पक्षाध्यक्षपद निवृत्तीचा निर्णय आज देशभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नेत्यांच्या विनंतीनंतर अखेर मागे घेतला आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी भवन येथे ढोल ताशांच्या गजरात, फटाके वाजवून पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी “देशाचा बुलंद आवाज…शरद पवार..शरद पवार” , “पवार साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” , “देश का नेता कैसा हो पवार साहेब जैसा हो” अशा घोषणा देत संपूर्ण राष्ट्रवादी भवनचा परिसर दणाणून सोडला.

 

यावेळी आनंदोत्सव साजरा करताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,
“गेली सहा दशके देशाच्या, राज्याच्या राजकारणातील ‘शरद पवार’ हे नाव कुणालाही, कुठेही थांबवता आलेलं नाही. देशाच्या कृषी, कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण, संस्कृतीक व औद्योगिक क्षेत्रात आदरणीय पवारसाहेबांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. या सर्व क्षेत्रांमध्ये पवारसाहेबांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले निर्णय आजही ‘आदर्शवत’ असे आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये आदरणीय पवारसाहेबांची देशाला व राज्याला नितांत आवश्यकता असताना आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेला हा निर्णय आम्हा कार्यकर्त्यांना धक्कादायक असाच होता.ज्यांना आदर्श मानत आमची पिढी राजकारणात आली,त्या नेतृत्वाच्या छायेत काम करत असताना त्या नेतृत्वाकडून अचानक पक्षाध्यक्षपद सोडण्याची घोषणा ऐकून कुठल्याही कार्यकर्त्याला आपल्या भावना आवरता येणार नाहीच,अशी परिस्थिती असताना कार्यकर्त्यांच्या मतांचा विचार करत आदरणीय साहेबांनी आज आपला निर्णय मागे घेतला आहे. आदरणीय साहेबांचा आधार पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांला हवा आहे.

देश एका अराजकतेच्या उंबरठ्यावर असताना आदरणीय साहेबांनी हा निर्णय मागे घेतल्याने, देशातील परिवर्तनाची ही लढाई जिंकण्यासाठी आता आम्ही सर्वजण सज्ज आहोत.आदरणीय साहेबांनी आपला निर्णय मागे घेतल्याबद्दल साहेबांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिपकभाऊ मानकर, दत्ताभाऊ सागरे, किशोर कांबळे, महेश हांडे, सुषमा सातपुते, समीर शेख, संदीप बालवडकर, गणेश नलावडे, राजश्री पाटील, नाना नलावडे, आनंद सागरे, भक्ती कुंभार , कुलदीपशर्मा , रोहन पायगूढ़े, फहीम शैख़ यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.