पुणे

“दुचाकीवरून धूम ठोकणाऱ्या चोरांच्या सिनेस्टाईलने पाठलाग करून आवळल्या मुसक्या – वानवडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत १० दुचाकी ताब्यात”

रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, रेल्वे अंडर बायपासजवळ दुचाकीवरून जाणारे दोन इसमांना वानवडी पोलिसांनी थांबविणेचा इशारा केला असता, त्यांनी वाहने भरधाव गतीने जोरात पळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

दि. 19 रोजी वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांचे आदेशाने वाहन चोरी प्रतिबंध करण्यासाठी तपास पथक प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना, रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, रेल्वे अंडर बायपासजवळ दुचाकीवरून जाणारे दोन अनोळखी इसमांना थांबविणेचा इशारा केला असता, त्यांनी त्यांची वाहने भरवाव गतीने जोरात करून पळुन जात असताना, त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

 

यावेळी आरोपी १) दिनेश रघुनाथ शिंदे, वय २८ वर्षे, रा. मातंग वस्ती, वैदयुवाडी, हडपसर, पुणे २) आकाश तुळशीराम ननवरे, वय २५ वर्षे, रा. गोसावी वस्ती हडपसर, पुणे यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडे अधिक तपास केला असता, पुणे शहरात वेगवेगळया परिसरात वाहन चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून वानवडी, कोंढवा, खडक, सांगवी पोलीस स्टेशनकडील गुन्हे उघडकीस आले असून, एकूण ०८ मोटारसायकल असा एकूण ३,६५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात
आला.

 

तसेच वानवडी पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजि. नंबर २२८ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपीस गुन्हयाचे ठिकाणी असलेल्या सीसीटिव्ही फुटेजवरून आरोपीने गुन्हयात चोरलेली यामाहा दुचाकी गुन्हा करतेवेळी वापरलेली पल्सर ताब्यात घेण्यात आली. आरोपीचा २४ तासाच्या आत शोध घेवून, आरोपी नामे बरकत अब्दुल शेख, वय ४५ वर्षे रा. जैन टाऊनशिप हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे यास अटक करण्यात आली. यावेळी यामहा कंपनीची एक दुचाकी तसेच पल्सर गाडी जप्त करणेत आलेली आहे. सदर गुन्हयात ०२ दुचाकी जप्त करून एकूण रु.१,००,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून २४ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

 

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त परि. ५. पुणे शहर विक्रांत देशमुख व सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर सौ. पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, सपोफौज / रासने, पोहवा अमजद पठाण, संतोष नाईक, विनोद भंडलकर, हरिदास कदम, अतुल गायकवाड, राहुल गोसावी, संदिप साळवे, निलकंठ राठोड, विष्णु सुतार, विठ्ठल चोरमले, अमोल गायकवाड व महिला पो. अंम मनिषा सुतार, सोनम भगत यांनी केली आहे.