हडपसर

विवाहितेची सासू सासरे व नवऱ्याच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह सासू, सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील फुरसुंगी भागात सासरच्या छळामुळे विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. विवाहितेस आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पतीसह, सासू व सासऱ्यांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सासरच्या छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मिळाली आहे.

सदरील घटना हडपसर भागताील फुरसुंगी परिसरात घडली असून महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव स्वालेहा अमन सनदी (वय 24, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) असे आहे. याप्रकरणी तिचा पती अमन कबीर सनदी (वय 25), सासरे कबीर बावासी सनदी (वय 55 ) यांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वालेहाची आई जाईदा मैंदर्गी (वय 53 कोल्हापूर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वालेहाचा अमन याच्याशी 2 वर्षांपूर्वी विवाह झाला होता तेंव्हापासून पतीकडून व सासू, सासऱ्याकडून तिचा छळ सुरू होता. घरकाम नीट जमत नसल्याच्या कारणावरून तीला सतत टोमणे मारणे चालू होते.

स्वयंपाकाच्या कारणावरूनही तीला मारहाण वगैरे होत असल्यामुळे तिने तिच्या आईला सांगितले होते. तसेच पती, सासू, सासऱ्यांनी माहेरहून पैसे आणण्याचा तगादाच लावला होता. या सततच्या छळाला कंटाळून स्वालेहाने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे तिची आई जाईदा यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी त्या तिघांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळदे करत आहेत.