पुणेमहाराष्ट्र

पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेत नसल्याच्या कारणावरून पतीने केले पत्नीवर ब्लेडने वार; हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

पुणे: प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : हडपसर भागातील लक्ष्मी कॉलनीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीने पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे न घेतल्याने पतीने पत्नीवर ब्लेडने वार केल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी सुरेखा कमलेश सांगळे ( वय वर्ष 28 )यांनी त्यांच्या पतीविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पती कमलेश काकासाहेब सांगळे (रा. शिरुरघाट, ता. केज. जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमलेशला मोबाइल विक्रीचे ( मोबाईल शॉपी ) दुकान सुरू करायचे होते. त्यामुळे पत्नीने आई वडिलांकडून पैसे आणावेत असा सतत तगादा लावत होता. परंतु सुरेखा काही वडिलांना पैसे मागत न्हवती त्यामुळे तो पत्नी सुरेखाचा शारिरिक आणि मानसिक छळ करत होता. शेवटी त्याच्या छळाला कंटाळून सुरेखा आई वडिलांकडे पुण्याला निघून आली. आणि हडपसर भागातील लक्ष्मीकॉलनी मध्ये भाड्याने खोली घेऊन राहू लागली.

सुरेखाने पुण्याला येण्यापूर्वी बीड पोलिसांत कमलेश, आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
त्यामुळे काल तो पुण्यात आला आणि कमलेशने पुन्हा तीला पोलिसांत दिलेली तक्रार मागे घे, असे सांगून त्याने सुरेखाला शिवीगाळ करून तिला मारहाण आणि तिच्यावर ब्लेडने वार केले. या घटनेत सुरेखा गंभीर जखमी झाली आहे. सदरील प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पाटोळे करत आहेत.