Uncategorized

“क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने उत्साहात साजरी !

पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

पुणे – क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांचा विजय असो! महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे! अशा पद्धतीच्या घोषणा देत महात्मा फुले वाडा येथे जयंती साजरी करण्यात आली, साध्वी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी महात्मा फुले दांपत्याला भारतरत्न किताब मिळालाच पाहिजे, या साठी केंद्र सरकारकडे सामूहिक पत्र लेखन करण्यात आले, याप्रसंगी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, केंद्रीय सचिव संजय जोशी, शहराध्यक्ष अपर्णा साठे मारणे, शहर कार्याध्यक्ष नितीन चाफळकर, पुणे शहर सचिव चित्रा साळवे, संघटक प्रभा अवलेलू, पुणे शहर उपाध्यक्ष राकेश बनसोडे, विशाल मारणे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.