पुणेहडपसर

साधना विद्यालयास “प्रो प्लॅनेट पीपल” पुरस्कार प्रदान.

हडपसर,वार्ताहर.

  नागरिकांनी पर्यावरण वाचविण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली आपल्या जीवनामध्ये अंगीकारणे व त्यास प्रोत्साहन देऊन पर्यावरणाचे संवर्धन करणे”,या उद्देशाने मे 2023 ते जून 2023 दरम्यान साधना विद्यालय व आर. आर.शिंदे ज्युनिअर कॉलेज, हडपसर येथील आजतागायत 1349 विद्यार्थ्यांनी “लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट”(लाईफ) या मिशन अंतर्गत शपथ घेऊन पर्यावरणपूरक विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवल्याने पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालय व इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रामार्फत साधना विद्यालयव आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेजला “ प्रो प्लॅनेट पीपल” म्हणून सन्मानित करण्यात आले.

 

ही मोहीम राबविण्यासाठी साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेजचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्डाचे सचिव दत्तात्रय जाधव, उपप्राचार्य डॉ. अमिरुद्दीन सिद्दीकी, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे,विज्ञान विभाग प्रमुख डॉ. धनाजी सावंत, कला व वाणिज्य विभागाचे प्रमुख विजय सोनवणे, व्होकेशनल विभाग प्रमुख पांडुरंग गाडेकर,राष्ट्रीय हरित सेनेचे व पर्यावरण विभागाचे प्रमुख शैलेश बोरुडे, साधना खोत यांचे मार्गदर्शन लाभले.