पुणे

परदेशी महिला आणि तरुणी व्हाट्सऍपद्वारे देहविक्रीचा व्यवसाय : गुन्हा दाखल

सध्या सर्वत्रच करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असताना शहरात परदेशी महिला आणि तरुणी व्हाट्सऍपद्वारे देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याची बाब समोर आली आहे. वाकड पोलिसांनी हा सर्व प्रकार उजेडात आणला असून संबंधितांना ताब्यातही घेण्यात आलं आहे.

या प्रकरणी २५ वर्षीय तरुणी आणि ४० वर्षीय महिलेविरोधात वाकड पोलीस ठाण्यात अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय परदेशी नागरिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतात राहण्यासाठी लागणाऱ्या व्हिजाची मुदत संपली असता बेकायदेशीररित्या राहात असल्याचेदेखील पोलीस तपास समोर आले आहे. या घटनेप्रकरणी वाकड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी सपना देवतळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ युगांडा येथे राहणारी २५ वर्षीय तरुणी आणि ४० महिला या पिंपरी-चिंचवड शहरात करोनाच्या महामारीच्या संकटात देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. त्यांनी एक व्हॉटसअ‍ॅप नंबर प्रचलित केला होता. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात राहत असलेल्या भाड्याच्या घरात ग्राहक बोलावून देहविक्रीचा व्यापार करत. दरम्यान, त्यांच्या या कृत्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत होती. दरम्यान, या घटनेची माहिती वाकड पोलिसांना मिळताच तातडीने संबंधित ठिकाणी जाऊन महिला आणि तरुणीला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, उपजीविका भागविण्यासाठी त्या देहविक्री करत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. या व्यतिरिक्त आणखी मोठे परदेशी रॅकेट आहे का ? याचा तपास वाकड पोलीस करत आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x