लग्नानंतर वधूसह कुटुंबीय फरार | 2 लाखांचा घोटाळा उघड

Rokhthok Maharashtra 12 0

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात धक्कादायक ‘वेडिंग फ्रॉड’चा प्रकार उघडकीस आला आहे. आरग गावात लग्नानंतरच वधूसह तिच्या कुटुंबीयांनी सोने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
फिर्यादी लक्ष्मण माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात सुमारे २३ हजारांचे मंगळसूत्र आणि तब्बल १ लाख ८० हजारांची रोकड देण्यात आली होती. लग्नानंतर काही दिवस सासरी राहिल्यानंतर वधू आणि तिचे नातेवाईक अचानक गायब झाले.

या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे ‘लग्न जुळवताना’ सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.