पुण्यातील एका नामांकित व्यावसायिकाकडे 50 कोटी रुपयांची खंडणी मागून गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीला पुणे गुन्हे शाखेने मोठा दणका दिला आहे. या प्रकरणातील चार आरोपींना हरियाणा आणि राजस्थानमधून जेरबंद करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.
२२ जून २०२६ रोजी व्यावसायिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फोन करून ५० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या दोन तासांत कंपनीच्या गेटवर चार राऊंड गोळीबार करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा माग काढला. पवन प्रकाशराम बारड याला राजस्थानमधून अटक करण्यात आली. कंपनीतील माहिती आरोपींपर्यंत पोहोचवणारा कामगार सत्यप्रकाश कालुराम शिलोरा यालाही अटक करण्यात आली.
यानंतर रवीकुमार राजेंद्रकुमार जांगडा आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला हनुमानगड येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून तीन गावठी पिस्तुले आणि ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
हरीयाणा, राजस्थान, गुजरात व पंजाब येथे सहा. पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जिवन माने, प्रशांत अन्नछत्रे, अमर कदम, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, श्रीकांत चव्हाण, प्रसन्ना जराड, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, महीला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, विनोद शिवले, ऋषिकेश ताकवणे, प्रफ्फुल मोरे, जंहागीर पठाण, शेखर खराडे, प्रशांत शिंदे, विठ्ठल वाव्हळ, अतुल साठे, योगेश झेंडे, ओंकार कुंभार, भरत गुंडवाड, निलेश साळवे, पृथ्वीराज पांडुळे, किरण लावंड, सागर गंगावणे, महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे, तृप्ती झगडे, चालक जावेद शेख यांनी तपास करुन वरील आरोपीना जेरबंद केले आहे.
या कारवाईमुळे खंडणीखोर टोळीचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे.
