२००३ साली घडलेल्या खून व दरोडा गुन्ह्यातील जप्त दागिने अखेर २३ वर्षांनी फिर्यादीच्या स्वाधीन
पूर्व हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ वर्षापूर्वी एक गंभिर स्वरूपाचा दरोडा व खूणच्या प्रकारातील जप्त सोन्याचे दागिने अखेर मूळ फिर्यादीला परत मिळवून देण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे.
मा.न्यायालयाच्या आदेशानुसार, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून १७ ऑगस्ट २०२६ रोजी हे दागिने फिर्यादीच्या स्वाधीन करण्यात आले.
पूर्व हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २००३ साली भा.द.वि.कलम ३९४( चोरी दरोडा करताना दुखापत करणे) व ३०२ खून अंतर्गत गुन्हा नोंद गु.र.नं.२०२/२००३ दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे विविध दागिने जप्त करण्यात आले होते. परत करण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे मंगळसूत्र ६.३४० ग्रॅम, सोन्याची बोरमाळ ४.८०० ग्रॅम,सोन्याचे झुबे जोडी २.७७० ग्रॅम, सोन्याची नथ ०.४८० मिली ग्रॅम येवढे सोन्याचे दागिने परत करण्यात आले.
न्यायालयाच्या आदेशने बी.एन. एस.एस .अन्वये कारवाई
कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणुन मा.न्यायालयाच्या आदेशानुसार आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता( BNSS) १०६ (३)पोट कलम १ अन्वये दिलेल्या बंद पत्रानुसार( bond ) हे दागिने सुपूर्द करण्यात आले. फिर्यादी अनिता दत्तात्रय टीपे (वय ४२ वर्ष रा.शिव शंभो सोसायटी,गोसावी वस्ती आश्रमरोड उरुळी कांचन ता. हवेली, जिल्हा पुणे) यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी अधिकृतपणे सर्व १४.३९ ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांच्या ताब्यात दिले आहे.





