कराड–मलकापूर उड्डाणपुलाखाली घसरडा रस्ता; वाहनधारकांना पोलिसांचे सावधानतेचे आवाहन

Rokhthok Maharashtra 8 0

कराड–मलकापूर उड्डाणपुलाखालील रस्त्यावर पावसामुळे घसरडा पृष्ठभाग निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी विशेषतः दुचाकीस्वारांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन कराड वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

वाहनधारकांनी वाहनांचा वेग कमी ठेवावा, अचानक ब्रेक मारणे टाळावे आणि रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज घेत अत्यंत सावधपणे वाहन चालवावे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आवश्यक ती काळजी घेत असून, रस्त्यावरील धोकादायक परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधित ठेकेदार कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदिप साळुंखे यांनी दिली.

दरम्यान, नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून वाहतूक नियमांचे पालन करावे आणि सुरक्षितपणे प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

“आपली थोडीशी सावधगिरी, मोठा अपघात टाळू शकते; त्यामुळे वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित प्रवास करावा,” असे आवाहन वाहतूक नियंत्रण संदिप साळुंखे
सहायक पोलीस निरीक्षक
वाहतूक नियंत्रण शाखा यांनी आव्हाहन केले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.