भंडारा-महाप्रसादासाठी FDA चे कडक नियम! परवानगीशिवाय वाटप केल्यास गुन्हा दाखल

Rokhthok Maharashtra 47 0

श्रावण महिन्यात मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या प्रमाणात भंडारा आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मात्र, आता असे आयोजन करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. अन्नातून विषबाधेच्या घटना टाळण्यासाठी FDA ॲक्शन मोडमध्ये आली असून आयोजकांसाठी काही नियम अनिवार्य करण्यात आले आहेत.
स्वयंपाक आणि पिण्यासाठी स्वच्छ किंवा RO पाण्याचा वापर करावा लागेल. अन्न बनवणाऱ्या आणि वाढणाऱ्या स्वयंसेवकांना मास्क, हँडग्लोव्हज आणि हेड कॅप वापरणे बंधनकारक असेल. प्रसाद जास्त वेळ उघड्यावर ठेवता येणार नाही, तसेच शिळे अन्न वाटल्यास कठोर कारवाई होऊ शकते.
अन्न साठवण्यासाठी आणि वाटण्यासाठी सुरक्षित, विशेषतः स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, केवळ 100 रुपयांत ऑनलाइन परवाना उपलब्ध असून तो घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. परवानगीशिवाय महाप्रसाद वाटल्यास आयोजकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.
म्हणूनच, श्रद्धेसोबत भाविकांचे आरोग्यही महत्त्वाचे… सेवा करा, पण स्वच्छतेची काळजी घेऊन!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.