उघड्या चेंबरमध्ये पडली दोन कुत्र्याची पिल्ले; PMC च्या कारभारावर संताप!

Rokhthok Maharashtra 40 0

पुणे महानगरपालिकेच्या बेजबाबदार कारभारावर आता नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हडपसरमधील पालखी रोड, लक्ष्मी पार्क, कृष्णानगर–महादेववाडी परिसरात उघड्या चेंबरमध्ये दोन निष्पाप कुत्र्याची पिल्ले पडल्याची घटना समोर आली आहे.
चेंबरला झाकण नसल्याने या मुक्या जीवांना जीवघेण्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीवरून पडून एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
एकीकडे रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे, तर दुसरीकडे उघडे चेंबर… अशा परिस्थितीत पुणेकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणावरून शिवसेनेने पुणे महानगरपालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. अजून किती निष्पापांचे जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? असा संतप्त सवाल करण्यात आला आहे.
नागरिकांच्या आणि मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या निष्काळजीपणावर आता तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.