धर्मराज जयस्वाल यांच्या कुटुंबीयांना तात्काळ पाच लाखांची सानुग्रह मदत द्या; हडपसरमध्ये महापालिकेच्या कचरा डंपरने घेतला तरुणाचा बळी – प्रमोद नाना भानगिरे

Rokhthok Maharashtra 4 0

हडपसरमधील अपघातात मृत्यू झालेल्या धर्मराज जयस्वाल यांच्या कुटुंबीयांना पुणे महानगरपालिकेने तात्काळ पाच लाख रुपयांची सानुग्रह मदत देऊन ती रक्कम कुटुंबीयांच्या स्वाधीन करावी, अशी मागणी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे. महापालिकेच्या कचरा डंपरच्या धडकेत धर्मराज जयस्वाल या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात सर्वे नंबर ५७, जीएसपीएम महाविद्यालयाच्या मागे, बाबाजी मंदिराशेजारी, आदर्शनगर, हांडेवाडी रस्ता, उरुळी देवाची येथे घडला. प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, एका तरुणाचा अशा पद्धतीने मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर बाब आहे. धर्मराज जयस्वाल यांच्या कुटुंबाचा आधार, त्यांच्या आशा,अपेक्षा आणि भविष्यातील स्वप्ने या अपघाताने उद्ध्वस्त झाली असून, पुणे महापालिकेने संवेदनशीलता दाखवत कोणताही विलंब न करता पाच लाखांची सानुग्रह मदत द्यावी.

महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेच

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.