माधवी कुंभारला सशर्त जामीन!

Rokhthok Maharashtra 3 0

फ्लाइंग जिप्सी कॅफे प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील रीलस्टार माधवी कुंभार यांना मोठा दिलासा मिळाला असून, पुणे सत्र न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटींचे पालन करण्याच्या निर्देशांसह माधवी कुंभार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर माधवी कुंभार यांची आज जेलमधून सुटका होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सशर्त जामीन मंजूर झाल्याने माधवी कुंभार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढे या प्रकरणात काय घडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.