पुणे विद्यापीठातील मुलींच्या हॉस्टेलमध्ये रात्री गोंधळ! २ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; विद्यार्थिनी आक्रमक

Rokhthok Maharashtra 10 0

पुणे विद्यापीठातील मुलींच्या हॉस्टेलमध्ये रात्री गोंधळ! दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल, विद्यार्थिनी आक्रमक!
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे!
मुलींच्या हॉस्टेलमध्ये परवानगीशिवाय प्रवेश केल्याच्या आरोपावरून दोन विद्यार्थ्यांविरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद राठोड आणि ओंकार गोरे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
११ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मुलींच्या वसतिगृहात अनधिकृत प्रवेश झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर विद्यार्थिनींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. रविवारी रात्री विद्यार्थिनींनी एकत्र येत आंदोलन केले आणि विद्यापीठ प्रशासनाला सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत जाब विचारला.
या प्रकरणी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी संपत पांडुरंग पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची भेट घेऊन वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी केली.
मुलींच्या हॉस्टेलमध्ये अनधिकृत प्रवेश होतोच कसा? सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर होणार कधी?
आता विद्यापीठ प्रशासन आणि पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोखठोक महाराष्ट्र न्यूज!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.