जेजुरी-मोरगाव रस्त्यावर काळाचा घाला! शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू!

Rokhthok Maharashtra 7 0

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर काळाचा भीषण घाला! शिवाई बसच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू!

पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. शिवाई बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.

महेंद्र नाझीरकर आणि रेश्मा नाझीरकर अशी मृत दाम्पत्याची नावे असून ते नाझरे येथील रहिवासी होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाझीरकर दाम्पत्य दुचाकीवरून प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या शिवाई बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

दरम्यान, या प्रकरणी बसचालकाविरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे नाझरे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.