मोठी बातमी! फडणवीस सरकारचा धडाकेबाज निर्णय; राज्यात ८ ठिकाणी नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू होणार!
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! राज्यात ८ ठिकाणी नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू होणार!
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी!
महसूलविषयक कामांसाठी आता दूरच्या तहसील कार्यालयात जाण्याचा त्रास कमी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील आठ ठिकाणी नवीन अपर तहसीलदार कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून महसूल विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.
चिंचोली खापरखेडा, घोट, सिन्नर, शिरपूर शहर, शहादा, जळगाव शहर, चाळीसगाव आणि पहूर या आठ ठिकाणी नवीन कार्यालये सुरू होणार आहेत.
या निर्णयामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना महसूलविषयक सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचण्यासोबतच प्रशासकीय कामकाजालाही गती मिळण्याची अपेक्षा आहे.
लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, आदिवासी लोकसंख्या आणि जिल्हा मुख्यालयापासूनचे अंतर अशा निकषांवर या कार्यालयांची निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी फडणवीस सरकारचा हा निर्णय किती फायदेशीर ठरणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





