पुणे

घरोघरी जाऊन कलाकार करतायत वासुदेवाच्या वेषात आरोग्य जागृती

 

पुणे (प्रतिनिधी)

कोरोनाच्या महामारीने साऱ्या जगाला हादरवून टाकले आहे ,जनजीवन विस्कळीत झाले आहे.. या मध्ये होरपळून निघाला कामगार वंचित वर्ग,. गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असलेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे पण मनोरंजन क्षेत्र अजूनही यापासून वंचित असून यावर निर्भर असणारे कामगार, कलाकार, लोककलावंत आर्थिकदृष्ट्या आजही विवंचनेत दिसुन येत आहे कुणीही सध्यस्थितीत त्यांच्यावर मायेची फुंकर घालण्याचा प्रयत्न केला नाही उलट तेच आपली आणि आपल्या कलाकार बांधवांची एक पाऊल पुढे कलाकार मदत केंद्र या सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून मदत करताना दिसत आहेत..,केवळ मदत नाही तर आरोग्याच्या दृष्टीने समाजात जनजागृती करीत आहे, प्रशांत बोगम व कुणाल देशमुख यांच्या पुढाकाराने वासुदेवाच्या वेषात कलाकार घरोघरी जाऊन ‘आरोग्याची काळजी घ्यावी’ माहिती सांगत आहे सोबत सँनीटायझर, अलबुमिन आर्सेनिक चे इमयुनिटी बुसटर गोळ्या, डिसइनफेक्टनट लिक्विड, लाँकडाउन मधे घेतलेल्या आँनलाईन स्पर्धेचे प्रमाणपत्र देत आहे ,.कोरोना लवकरच जाणार आणि आपला देश पुन्हा गुण्यागोविंदाने नांदत राहील अशी ,देशावरील या संकटातून सर्व सुखरूपपणे बाहेर पडतील देशाकरीता लढण्यासाठी हा आमचा खारीचा वाटा आहे या वेळी कलाकारांनी सर्वाना उद्देशुन सांगितले

0 0 votes
Article Rating
162 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments