
प्रभाग क्र २६ चा विद्दुत अंतर्गत कामाचे शुभारंभ व कोरोना लॉकडाउन मुळे किंवा स्थनिक नागरिकांच्या अन्य समस्या मुळे रखडलेल्या कामाला व प्रारंभ करण्यात आला आहे, निवडणुकीत दिलेला शब्द पाळत नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या यांच्या विशेष प्रयत्नांतून स्वयंभू कॉलनी हांडेवाडी रोड भैरवनाथ मंदिर महमंदवाडी गाव तसेच काळे पडळ, सातवनगर व फ्रेंड्स कॉलनी बडदे मळा, तसेच इतर सर्व भागात काम चालू करण्याचा सपाटा लावला आहे.
विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात जेष्ठ नागरिक व मोठ्या प्रमाणात महिला सामाजिक कार्याचे शिल्पकार वैशाली कुदळे, प्रकाश कुदळे, बेबी नागवडे, वैशाली लगड, सुरेश लगड, रवी बनसोडे, ज्योती बनसोडे, आरती लातूरकर शालन लातूरकर,भालचंद्र कुलकर्णी, सुनंदा कुलकर्णी तेजश्री पाटील, गोपाल पाटील, अतुल पाटील, संगीता बनसोडे, हबीद शेख, प्रवीण नागवडे, बबन बनसोडे फातिमा भाभी, नाशिर चाचा नालबंद सहभागी झाले होते.
सातवनगर भागातील विकासकामे शुभारंभ प्रसंगी अशोक जगताप, किसन पाचारणे, कुमार झेंडे, लक्ष्मण मालेवार, महेश रसाळ, विठ्ठल शिंदे,गोकुळ मोकासरे, रेखा होले, नायर भाभी, कार्यक्रमाचे आयोजक विक्रम फुकटे, प्रकाश कालगुडे, राजू गवळी, मनोज जाधव बाळासाहेब आल्हाट उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आयोजक टीम चे अभिजीत बाबर यांनी आभार व्यक्त केले.
निवडणुकीत दिलेल्या शब्दाला जागून विकासकामे
प्रभागातील नागरिक व मतदारांनी विश्वास टाकून मतदान केले, त्यांचा विश्वास सार्थ ठरवत निवडणुकीत दिलेला शब्द पाळत प्रभागात विकासकामे राबविली जात आहेत, माझा प्रभाग माझे कुटुंब समजून आवश्यक नागरी सोयीसुविधा देणे आमचे कर्तव्य आहे, महापालिकेच्या माध्यमातून अनेक प्रकल्प नागरिकांसाठी राबविले जात आहेत.
प्रमोद नाना भानगिरे
नगरसेवक – पुणे महापालिका
