वंचित बहुजन आघाडी पुणेशहर पदाधिकारी यांनी घेतली जिल्हाधिकारीआणि आरोग्यप्रमुख पुणे महानगरपालिका यांची भेट

Rokhthok Maharashtra 24 381

कोव्हिड १९ कोरोना रुग्णांच्या प्रश्नांबाबत मा.जिल्हाधिकारी पुणे त्याचप्रमाणे आरोग्य प्रमुख पुणे महानगरपालिका यांची वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली.रुग्णांकरीता बेड,ऑक्सिजन व वेंटिलेटर तसेच रेमडीसिवीर बाबत योग्य उपाय-योजना करुन रुग्णांची होणारी हेळसांड त्वरीत थांबवण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी कडुन तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते संतोष संखद, युवा प्रदेश सदस्य ऋषिकेश नांगरेपाटील, महासचिव जितेंद्र जाधव,महेश कांबळे,संघटक मनोज क्षिरसागर, सदस्य किशोर लष्करे,विवेक लोंढे,पितांबर धिवार,फरहान शेख, दिलीप क्षेत्रे युवा आघाडी चे अतुल नाडे, ओंकार कांबळे, अभिजित बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

0 0 votes
Article Rating
381 Comments
Oldest
Newest Most Voted
Test User
11 months ago

Great article!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.