पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकासाकडे काँग्रेस पक्षाचे लक्ष असून लवकरच पक्षाकडून मोहीम हाती घेतली जाईल, ही गावे बकाल होऊ देणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी जाहीर केले आहे.मोठ्या शहरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने आग्रही राहिला आहे.केंद्रामध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण योजना ठोसपणे राबविली होती. सांडपाणी निचरा प्रकल्प, प्रशस्त रस्ते, नदी सुधारणा अशा मूलभूत विकास कामांसाठी हजारो कोटींचा निधी काँग्रेस सरकारने उपलब्ध करून दिला होता. राज्यात काँग्रेस आघाडी सरकार असताना मेट्रो या महत्त्वाकांक्षी योजनेचा पाया रचला गेला. हरित पुणे ही संकल्पना काँग्रेस पक्षाने मांडली आणि शहरातील टेकड्यांचे जतन केले.कॉंग्रेस पक्षाचे शहर विकासाचे धोरण राबवून पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांकडे लक्ष ठेवून तेथील समस्या सोडविणे, विकास कामांसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देणे याकरिता मोहीम आखून काँग्रेस पक्ष पाठपुरावा करेल, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क मंत्री सुनिल केदार यांना गावांच्या विकासासाठी मागण्यांचे निवेदन देऊन त्यांचे दौरे आखले जातील, २३ गांवातील पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जातील. आगामी निवडणुकीची व्यूहरचना केली जाईल, असे मोहन जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
२३ गांवे बकाल होऊ देणार नाही, गावांच्या विकासासाठी काँग्रेस मोहीम राबविणार – माजी आमदार मोहन जोशी
July 4, 20210

Related Articles
April 16, 20260
अमृता लॉजमध्ये अवैध धंद्याचा पर्दाफाश
"बारामतीत पोलिसांची मोठी कारवाई… अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश!"
बारामत
Read More
March 11, 20240
“हडपसर मधून डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुकले महाविकास आघाडी एकमुखाने डॉ. कोल्हे यांच्या पाठीशी – बैठकीत निर्धार
पुणे (प्रतिनिधी )
आगामी शिरूर लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर हडपसर विधानसभा
Read More
March 19, 20240
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सायबर सुरक्षा आणि जाणीव जागृती या विषयावर व्याख्यान
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य
Read More