घरकाम करणाऱ्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, चोरीचा आळ सहन न झाल्याने स्वतःला घेतले संपवून

Rokhthok Maharashtra 17 0

प्रतिनिधी: स्वप्निल कदम

पुणे: घरमालकिनिने चोरीचा आळ घेतल्याने तो सहन न झाल्याने एका १७ वर्षाच्या घरकाम करणाऱ्या तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मोहम्मदवाडी येथे शुक्रवार ( दी.३१) ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी कोंढवा पोलीसांनी घरमालकीणवर गुन्हा दाखल केला आहे.

पायल बाबू चव्हाण ( वय १७ रा. कृष्णानगर, मोहम्मदवाडी) असे आत्महत्या केलेल्या घरकाम करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या आई ने कोंढवा पोलीसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी उंड्री येथील एका ४० वर्षाच्या महिलेवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल ही उंड्रीतील आरोपी महिलेच्या घरी गेल्या काही महिन्यांपासून घरकाम करीत होते. या महिलेने तिच्यावर पर्स व चप्पल चोरीचा आळ घेतला होता. त्यावरून घरमालकीण पायलला त्रास देत होती. चोरीचा हा आरोप सहन न झाल्याने तिने शुक्रवारी घरात गळफास घेऊन जीवनाचा शेवट केला कोंढवा पोलीस तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.