थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जागेत एका अनोळखी महिलेचा खून

Rokhthok Maharashtra 32 0

प्रतिनिधी- स्वप्निल कदम

लोणी काळभोर – लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील थेऊर येथील चिंतामणी हायस्कूल शेजारी थेऊर ता. हवेली, जिल्हा- पुणे येथे यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पडीक जागेत दि.५/७/२०२२ रोजी एका २० ते २५ वर्ष वयोगटातील महिलेच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे.
ह्या गुन्ह्यातील मयत महिलेची ओळख पडलेली नसून तीची ओळख नष्ट करण्याच्या हेतूने तिच्या तोंडावर दगड मारून तोंड विद्रूप करण्यात आला आहे.
त्या गुन्ह्यात आरोपीवर गुन्हा रजिस्टर नंबर ३५४/२०२२ भा. द. वि. कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध चालू आहे.
सदर गुन्ह्याचा तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक (गुन्हे )श्री सुभाष काळे ,पोलीस उप निरीक्षक ,श्री अमित गोरे ,श्री विष्णू देशमुख हे करीत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.