“हडपसरमधील जेष्ठ कबड्डीपटू शिवाजीराव गेनूभाऊ भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन”

Rokhthok Maharashtra 22 0

हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
हडपसर परिसरातील माजी स्वीकृत नगरसेवक सागरराजे भोसले यांचे वडील शिवाजीराव गेनूभाऊ भोसले वय 83 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.
शिवाजीराव गेनूभाऊ भोसले अतिशय निष्णात कबड्डीपटू होते, अनेक स्पर्धामध्ये त्यांचा सहभाग होता, हडपसर मधील त्यांच्या कब्बडी टीमने अनेक पारितोषिके मिळविली आहेत, ते ऑरगन वेल्डर होते, 1981 साली ते इंग्लंड मध्ये गेले होते, समुद्रातील पाईप वेल्डिंग करण्याचे काम त्यांनी केले, त्याआधी कंपनीच्या माध्यमातून त्यांनी भारतभ्रमण केले होते.
हडपसर मधून परदेशात जाऊन वास्तव्य केलेले ते पहिले होते. त्यांच्या जाण्याने जुन्या जाणत्या पिढीतील कब्बडी पटू गमावल्याचे अनेक मान्यवरांनी सांगितले.
त्यांचे चिरंजीव माजी स्वीकृत नगरसेवक सागरराजे भोसले यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे कोरोना काळातही त्यांनी नागरिकांना अनेक प्रकारे मदत केली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.