लोणीकाळभोर येथील पवार कुटुंबाचा मतिमंद शाळेतील मुलांसमवेत मुलीचा प्रथम वाढदिवस साजरा करून R O चा २५ लिटर फिल्टर दिला भेट…!

Rokhthok Maharashtra 20 0

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

कदमवाकवस्ती, येथील महावीर मतिमंद विद्यालय येथे रोहित पवार यांनी त्यांच्या सर्व मित्र परिवारासमवेत समाजातील “वंचित घटकाचे आपण काहीतरी देणे लागतो” असा आदर्श दृष्टिकोन ठेऊन त्यांची मुलगी मनस्वी हिचा प्रथम वाढदिवस महावीर मतिमंद विद्यालय या ठिकाणी साजरा केला. रोहित पवार व करुणा रोहित पवार आणी त्यांच्या कुटुंबाने मतिमंद शाळेतील मुलांच्या समवेत केक कापून तसेंच तेथील 50 मुलांना पावभाजी पुलाव अशा प्रकारचे दोन वेळचे जेवण देऊन साजरा केला,तसेच शाळेतील मुलांसाठी व स्टाफ साठी चांगले शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे म्हणून R O चा 25 लिटर्स चा फिल्टर ही भेट म्हणून दिला.

यावेळी रोहित पवार, करुणा रोहित पवार त्यांची आई, चुलती, मुलगी मनस्वी रोहित पवार, वहिनी, भाऊ, सासू सासरे तसेच मित्रपरिवार राजेंद्र पाटील, नितीन पाकळे, आनंद कोळेकर, पांडुरंग शिंदे, वैभव कोठावळे, राजेश उघडे, स्वप्निल काटकर, नितीन पारवे, अभिषेक वाघ, विशाल अष्टेकर तसेंच पत्रकार संजय कुलूत व रमेश निकाळजे उपस्थित होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.