पुणे

धक्कादायक वृत्त :- हडपसर मध्ये डान्स टिचर कडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

हडपसर मध्ये डान्स टिचर कडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

पुणे : प्रतिनिधी :

पुणे : हडपसर येथील काळेपडळ मध्ये “स्वरुपम डान्स

अकॅडमी” नावाने एक डान्स क्लास आहे. त्याचा मालक सुशिल कदम ( वय वर्ष 32 ) रा. गोपाळपट्टी, मांजरी हा क्लास चालवतो. क्लास मध्ये परिसरातील अनेक मुले मुली तेथे डान्स शिकण्यासाठी जातात त्यापैकी एका अल्पवयीन मुलीला फूस लावून आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काल सासवड रोडवरील एका लॉज मध्ये घडली आहे. मुलीच्या आईनेच दिवे गावच्या हद्दीतील एका लॉजवर कदम व तिच्या मुलीला पकडले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डान्स क्लासमध्ये डान्स शिकण्यासाठी आलेल्या एका 15 वर्षीय मुलीला फसवुन हडपसर-सासवड मार्गावरील एका लॉजवर नेऊन, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.

 

सुशिल कदम याने गुरुवारी दुपारी चार वाजनेच्या सुमारास त्याच्याच डान्स क्लासमधील एका मुलीला फसवुन हडपसर-सासवड मार्गावरील दिवे गावच्या एका लॉजवर घेऊन गेला असल्याचे मुलीच्या आईला समजले त्यामुळे मुलीच्या आईने सुशिल कदम व अल्पवयीन मुलीला थेट लॉजवर जाऊन पकडल्याने, वरील प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान मुलगी अल्पवयीन असल्याने हडपसर सुशिल कदम याच्या विरोधात पोक्सो कायदद्या अंतर्गत लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

 

सुशिल कदम याने तिला लॉजवर नेले. व त्या ठिकाणी तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. दरम्यान मुलगी वेळेत घरी का आली नाही याचा शोध त असतांना, मुलीच्या आईला सुशिल कदम बद्दल संशय आला. यातुन सुशिल कदमचा ठावठिकाणा शोधण्यासाठी मुलीच्या आईने थेट हडपसर – सासवड मार्गावरील कदम व मुलगी असलेले लॉजच शोधुन काढले. आणि सुशिल कदम व मुलगी दोघांना लॉजवर पकडले. सुरुवातीला झालेला प्रकार मिटवून घेण्यासाठी सुशील ने  हातापाया पडून विनंती केली. पण मुलीची आई ऐकत नाही असे दिसताच दमदाटी करून धमकवण्याचा प्रयत्नही केला. परंतु मुलीच्या आईने 100 नंबर ला कॉल करून कळवल्यामुळे सासवड पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहचले व सुशिल कदम याला अटक करून हडपसर पोलिसांच्या हवाली केले. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.