पुणे

उज्वला जंगले, नंदा लोणकर, अमृता बाबर स्थायी समितीवर ; आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन स्थायी समितीत महिलांना संधी ; हडपसर मतदारसंघात तिघींना मिळाली संधी

रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज
पुणे : महापालिकेची आगामी निवडणूक आणि नव्या राजकीय समीकरणे जुळवत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने स्थायी समितीतील नव्या चारही जागांवर अनुभवी आणि नव्या नगरसेविकांना संधी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसनेही हाच फॉर्म्युला वापरत आपल्या वाट्याच्या तीन जागांसाठी महिलांचीच निवड केली आहे. परिणामी, स्थायी समितीत आता महिलाराज राहणार असल्याचे स्पष्ट आहे. स्थायी समितीच्या नव्या सदस्यांची सर्वसाधारण सभेत सोमवारी निवड झाली. हडपसर विधानसभा मतदारसंघात तीन महिला नगरसेविकांना संधी मिळाली आहे.

भाजपकडून नगरसेविका वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, उज्ज्वला जंगले आणि सुनीता गलांडे यांची वर्णी लागली. राष्ट्रवादीने नगरसेविका नंदा लोणकर, अमृता बाबर यांना स्थायीच्या कारभारात लक्ष घालण्याची जबाबदारी दिली आहे. काँग्रेसने लता राजगुरु यांना संधी दिली आहे. शिवसेनेकडून बाळा ओसवाल यांची निवड झाली आहे. स्थायी समितीच्या इतिहास पहिल्यांदाच इतक्‍या प्रमाणात महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे.

हडपसर मतदारसंघात तीन महिलांना संधी
हडपसर विधानसभा मतदारसंघात इच्छूकांची मोठी गर्दी महापालिका स्थायी समिती सदस्य पदासाठी होती, विरोधी पक्षनेते पद न मिळाल्याने नंदा नारायण लोणकर या नाराज होत्या त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती, त्यांना स्थायी समिती मध्ये घेऊन त्यांचे बंड राष्ट्रवादी काँग्रेसने थोपवले आहे, तर कात्रज मधून अमृता बाबर यांना संधी दिली आहे, माजी उपमहापौर निलेश मगर यांच्या पत्नी नगरसेविका हेमलता मगर यांना मात्र डावलले गेल्याने नाराजी पसरली आहे, तर भाजपकडून अपेक्षेप्रमाणे उज्वला सुभाष जंगले यांना संधी देऊन माजी आमदार योगेश टिळेकर यांनी तळागाळातील कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. उज्वला जंगले यांनी राजकारणात खूप संघर्ष केल्याने त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. शिवसेनेकडून उच्चशिक्षित असलेल्या प्राची आल्हाट यांनी स्थायी समिती मिळावी खूप प्रयत्न केले, मात्र सेनेकडून बाळा ओसवाल यांना संधी मिळाल्याने आल्हाट यांना डावलण्यात आले आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
तिजोरीची चाव्या असलेल्या स्थायी समिती सदस्य पदी हडपसर विधानसभा मतदारसंघात तीन महिला नगरसेविकांना संधी मिळाल्याने आगामी काळात येथे निधी मोठ्या प्रमाणात मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 0 votes
Article Rating
147 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments