“आयटीवाला नवरा नको!” लग्नाच्या बाजारात IT इंजिनिअर्सची क्रेझ कमी?

Rokhthok Maharashtra 11 0

एकेकाळी लग्नाच्या बाजारात सर्वाधिक डिमांड असायची ती आयटी इंजिनिअर मुलांची!
मोठा पगार, परदेशात नोकरी आणि सुरक्षित भविष्य… त्यामुळे “आयटीवाला नवरा” म्हणजे परफेक्ट मॅच मानली जायची.
मात्र आता चित्र बदलताना दिसत आहे.
“आयटीवाला नवरा नको गं बाई” अशी भावना काही मुली आणि पालकांमध्ये निर्माण होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे एआय आणि जागतिक मंदी.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI मुळे अनेक पारंपरिक आयटी नोकऱ्यांवर धोका निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.
त्यातच मोठ्या कंपन्यांकडून नोकरकपात, पगारवाढीवर ब्रेक आणि नवीन भरती कमी झाल्याने आयटी क्षेत्रातील अनिश्चितता वाढली आहे.
करोना काळात मोठ्या प्रमाणात भरती झाल्यानंतर आता अनेक तरुणांमध्ये नोकरीबाबत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
तज्ज्ञ मात्र सांगतात की, आयटी क्षेत्र संपलेलं नाही.
नवीन तंत्रज्ञान शिकून स्वतःला अपडेट ठेवणाऱ्यांसाठी अजूनही मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
पण बदलत्या काळामुळे लग्नाच्या बाजारातील आयटी इंजिनिअर्सची क्रेझ मात्र कमी होत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.