सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत झाडांचा वाढदिवस! कराडमध्ये वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम

Rokhthok Maharashtra 2 0

कराडमध्ये पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देणारा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. टीम वसंतगड यांच्या पुढाकारातून “झाडांचा वाढदिवस” आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
यावेळी रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्राचे अभिदादा काशीद, सामाजिक कार्यकर्ते अक्षय चव्हाण, संग्राम पवार तसेच कराडचे आरटीओ कनसे साहेब, डीवायएसपी राजश्री पाटील, नागपूर जिल्ह्याचे कलेक्टर, कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सागर बर्गे, टीम वसंतगडचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ माळी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यापुढेही अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्याचे आश्वासन सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांना दिले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.