दिवाळीत विमान तिकिटांचा भडका! पुणे-दिल्ली तिकीट २२ हजारांपर्यंत
दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर विमान तिकिटांच्या दरांत मोठी वाढ झाल्याने प्रवाशांचे बजेट कोलमडले आहे. पुणे ते दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि दुबई या प्रमुख मार्गांवर तिकिटांचे दर वाढल्याचे समोर आले आहे.
पश्चिम आशियातील संघर्षामुळे विमान इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढलेली मागणीही भाडेवाढीचे प्रमुख कारण ठरत आहे.
पुणे ते बंगळुरू या मार्गावर पूर्वी सुमारे पाच हजार रुपयांत मिळणारे एकेरी तिकीट आता काही तारखांसाठी आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर पुणे-दिल्ली प्रवासासाठी काही तारखांना १६ ते २२ हजार रुपये मोजावे लागू शकतात.
पुणे-दुबई मार्गावरही तिकिटांचे दर २० ते २२ हजार रुपयांपर्यंत गेल्याचे सांगण्यात येत आहे.
एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि इंडिगोनेही इंधन शुल्कात बदल केले आहेत.
त्यामुळे दिवाळीत गावी जाणारे विद्यार्थी, आयटी कर्मचारी आणि पर्यटकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
तुम्हालाही विमान तिकिटांच्या वाढत्या दरांचा फटका बसला आहे का? कमेंटमध्ये सांगा!





