1 डिसेंबरपासून 8 मोठे बदल! गॅस सिलेंडर, आधार अन् SBI क्रेडिट कार्डचे नवे नियम

Rokhthok Maharashtra 10 0

डिसेंबर महिना सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत… पण १ डिसेंबरपासून तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे! कारण गॅस सिलेंडर, SBI क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, बँकिंग आणि गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वाचे बदल समोर आले आहेत.
सर्वात आधी SBI क्रेडिट कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! वाहतूक सेवांवर एका व्यवहारात ३० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास आणि एका बिलिंग सायकलमध्ये इंधनावर ५० हजारांपेक्षा जास्त खर्च केल्यास १ टक्का अतिरिक्त शुल्क लागू होणार आहे.
दुसरीकडे, २ ते ४ डिसेंबरदरम्यान RBI ची पतधोरण समितीची बैठक होणार आहे. त्यामुळे रेपो रेटमध्ये बदल झाल्यास गृहकर्जाच्या EMI आणि FD वरील व्याजदरांवर परिणाम होऊ शकतो.
तसंच, SEBI कडून कमोडिटी ट्रेडिंगसाठी नवीन मार्जिन नियम लागू होणार आहेत.
आधार कार्डधारकांसाठी मात्र दिलासा आहे. UIDAI ने आधार ॲपच्या माध्यमातून ईमेल अपडेट करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ७५ रुपयांचे शुल्क माफ केले आहे.
परदेशात राहणाऱ्या पात्र NRI आणि OCI गुंतवणूकदारांनाही आता डिजिटल माध्यमातून KYC पूर्ण करता येणार आहे.
आता सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे १ डिसेंबरला घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर स्वस्त होणार की महाग, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
याशिवाय पेन्शनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत आपलं लाइफ सर्टिफिकेट जमा केलं आहे की नाही, याची खात्री करून घ्या.
त्यामुळे डिसेंबर सुरू होण्याआधीच हे बदल जाणून घ्या, कारण यातील काही नियमांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.