हडपसरच्या विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहात दिव्यांगांची अवहेलना! जितेंद्र ननावरे आक्रमक, प्रशासनाला जाब
हडपसरमधील विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहात दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा नसल्याने दिव्यांगांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप समोर आला आहे.
नाट्यगृहासारख्या सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांसाठी मूलभूत सुविधाच उपलब्ध नसतील, तर त्यांनी कार्यक्रमांना जायचे कसे? असा सवाल उपस्थित होत आहे.
या प्रश्नावर दिव्यांग नेते जितेंद्र ननावरे आक्रमक झाले असून त्यांनी थेट प्रशासनाला जाब विचारला आहे.
दिव्यांगांच्या सुविधांकडे प्रशासन आणखी किती दिवस दुर्लक्ष करणार? तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.





