अमरावतीत जुगार अड्ड्यावर छापा! ८ जणांवर कारवाई; २.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Rokhthok Maharashtra 6 0

अमरावती ग्रामीण पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. नांदगाव खंडेश्वर हद्दीतील कोहळा खानापूर परिसरात ताश पत्त्यांवर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली.
या कारवाईत राहुल गुरुनाथ मेश्राम शरद सुधाकरराव तावडे, राजेश अजाबराव शेलोकार, कुलदीप उर्फ श्याम अनंतराव यादव, विक्की वसंतराव भगत, धीरज रमेशराव सोळंके , ज्ञानेश्वर जीवनराव चव्हाण आणि दिनेश गजानन गुल्हाने या आठ जणांची नावे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहेत.
पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम, सात मोबाईल, तीन मोटारसायकली, ताश पत्ते आणि ताडपत्री असा एकूण २ लाख ८३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या प्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अमरावती ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगाराच्या अड्ड्यांचे धाबे दणाणले आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.