पुण्यात हवेची गुणवत्ता खालावली! चार भागांत प्रदूषणाचा विळखा

Rokhthok Maharashtra 7 0

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरातील हवेची गुणवत्ता खालावली असून, धूलिकणांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगर, लोहगाव, हडपसर आणि भोसरीसह शहरातील अनेक भागांत सलग तीन दिवस हवेतील सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण मध्यम श्रेणीत नोंदवले जात आहे.
कोरडे हवामान, बांधकामांमधून उडणारी धूळ, आरएमसी प्रकल्प, खडी क्रशर, उघड्यावर जाळला जाणारा कचरा आणि वाहनांचा धूर ही प्रदूषण वाढण्यामागील प्रमुख कारणे आहेत.
वाढत्या प्रदूषणामुळे दमा आणि श्वसनविकार असलेल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे पुणेकरांनी प्रदूषणापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.