उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वारकरी सेवा अभियानाचे उद्घाटन

Rokhthok Maharashtra 34 0

पंढरपूर वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सेवेसाठी फिनोलेक्स पाईप्सने विविध सामाजिक उपक्रम सुरू केले असून, या उपक्रमाचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फिनोलेक्स पाईप्सत आणि सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यामातून वारकऱ्यांना युटिलिटी बॅग, पावसाळी घोंगता आणि आधारासाठी काठी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे. वारी मार्गावर मोफत आरोग्य शिबिरे, औषधोपचार आणि आरोग्य तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय पोलिसांना रेनकोट, क्विक रिस्पॉन्स टीमला विशेष जॅकेट्स, माहिती फलक, तसेच हरित वारीसाठी वृक्षारोपण आणि कचरापेट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पी. छाब्रिया आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या विश्वस्त रितु पी. छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.