कदमवाक् वस्ती येथिल पालखी स्थळावर वृक्षारोपण व सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णु ताम्हाणे यांचा निवृत्ती समारंभ, तसेच ‘कबीर वाणी’ पुस्तकाचे लेखक नामुगडे सर यांचा सत्कार संपन्न

Rokhthok Maharashtra 2 0

कदमवाक् वस्ती येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे सध्या विद्यार्थी फक्त पुस्तकी ज्ञान्यावर भर देत असून तो खेळ, व्यायाम यापासून दुरावत चालला आहे.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आई वडिलांची सेवा करून व्यसनापासून दूर राहून ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा यश नक्कीच मिळेल असे मत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णू ताम्हाणे यांनी मांडले .कदमवाकवस्ती येथील पालखी मैदान येथे शनिवारी (दि. १३) सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णु सीताबाई नाथा ताम्हाणे तसेच “कबीर वाणी” पुस्तकाचे लेखक सूर्यकांत शंकर नामुगडे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन दत्तात्रय अंबुरे आणि स्वप्नील कदम यांनी केले होते.
यावेळी उपस्थित ग्राहक समिती (मंत्री दर्जा )चे माजी अध्यक्ष सूर्यकांत गवळी,निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णू ताम्हाणे, कवी सूर्यकांत नामुगडे,उद्योजक प्रसाद काळभोर व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्ष लागवडीचे महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त केला. कवी सूर्यकांत नामुगडे यांनी आपल्या ”बापाच्या बापाच्या देव अंगात यायचा” ही कविता सादर करून कबीरांच्या दोह्याची माहिती उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, मनोज काळभोर,शंकर काळे, ज्ञानेश्वर नामुगडे, रमेश निकाळजे, सागर काळभोर पत्रकार, बापूसाहेब कोळपे, पत्रकार
सतीश काळभोर, पृथ्वीराज काळभोर,गोरख लोणकर,अण्णा पवार, राम भंडारी, अमन शेख,मंगेश काळभोर,अक्षय दोमाले,नारायण गायकवाड, कल्याण पवार,विजय जाधव, सागर रिकीबे, स्वप्नील शिवकर गोरख लोणकर, अप्पा सकपाळ, आरती सकपाळ, युवराज अंबुरे,फैय्याज खान आणि
विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.