केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक | ज्येष्ठ पैलवान किसनराव मोहोळ यांचे निधन

Rokhthok Maharashtra 23 0

पुण्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील, ज्येष्ठ पैलवान आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर किसनराव दगडोबा मोहोळ यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे.
गुरुवारी रात्री १० वाजून २० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किसनराव मोहोळ यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल ४० वर्षे सेवा बजावत सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती.
एकेकाळी त्यांनी कुस्तीच्या आखाड्यात आपल्या दमदार कामगिरीने नावलौकिक मिळवला होता. सेवाभावी वृत्ती, कर्तव्यनिष्ठ स्वभाव आणि पैलवानकीचा वारसा यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क होता.
मुरलीधर मोहोळ यांनाही कुस्तीची प्रेरणा व वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला. पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश करून महापौर ते केंद्रीय राज्यमंत्री असा यशस्वी प्रवास केला.
किसनराव मोहोळ यांच्या निधनामुळे मोहोळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून विविध क्षेत्रांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.