जालन्यात एसीबीचा मोठा सापळा, दोन लाचखोर जेरबंद!

Rokhthok Maharashtra 32 0

जालना जिल्ह्यात एका दिवसात दोन वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये एसीबीने मोठी कारवाई करत लाचखोर अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे.
पहिल्या कारवाईत पंचायत समितीअंतर्गत मनरेगा योजनेच्या विहिरीच्या कामासाठी अकुशल मजुरांच्या हजेरीपत्रकाला मंजुरी देण्यासाठी आरोपी संदीप राऊत याने लाचेची मागणी केली होती. एसीबीने जिल्हा परिषद कार्यालयात सापळा रचत त्याला रंगेहाथ अटक केली.
या कारवाईत आरोपीकडून लाचेची रक्कम, एक आयफोन आणि १४ हजार ६०० रुपये रोख जप्त करण्यात आले.
तर दुसऱ्या कारवाईत मृद व जलसंधारण विभागातील कनिष्ठ लिपिक रमेश खरे याला ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे ३ लाखांहून अधिकचे देयक मंजूर करून देण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती.
एका दिवसात दोन लाचखोरीच्या कारवायांमुळे जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून दोन्ही आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.