देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतूस बाळगणारा अटकेत, हडपसर पोलिसांची कारवाई !

Rokhthok Maharashtra 2 0

पुणे ः देशी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्याला हडपसर पोलिसांनी अटक केली. चिराग संजय सर्जेराव (वय २३, अभिलाषा हाईट्स, म्हसोबावस्ती, मांजरी बु।।, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे, वाहनचोरी प्रतिबंधक करण्यासाठी पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी संशयित वस्तू बाळगणारी व्यक्ती असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसानी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी त्याच्याकडे एक देशी बनावटीचा कट्टा व जीवंत काडतूस मिळून आले. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.

सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी, सत्यवान गेंड, अविनाश गोसावी, दीपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजित राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महावीर लोंढे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.