उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेर रक्तरंजित घटना! युट्यूबरच्या डोक्यात झाडल्या दोन गोळ्या!

Rokhthok Maharashtra 3 0

ठाणे जिल्ह्यात गोळीबाराच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच, आता उल्हासनगरमध्ये एका प्रसिद्ध युट्यूबरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
हरीश गजवानी असं मृत युट्यूबरचं नाव आहे. बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेरील वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागून येत गजवानी यांच्या डोक्यात अगदी जवळून दोन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, चार वर्षांपूर्वी झालेल्या एका जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेशी या प्रकरणाचा संबंध आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी नाकेबंदी करण्यात आली आहे.
वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या हत्येमुळे उल्हासनगरसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.