“बलात्काराची केस मागे घे” म्हणत भावावर जीवघेणा हल्ला | CCTV ने उघड केला थरार

Rokhthok Maharashtra 2 0

बीडमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. “तुझ्या बहिणीने माझ्यावर केलेली बलात्काराची केस मागे घे” अशी धमकी देत एका तरुणावर पाच जणांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही आता समोर आला आहे.
व्हॉईस ओव्हर :
ही घटना 26 मे रोजी गेवराई शहरालगत घडली. मंगेश भुराजी शिंदे याच्यावर कुऱ्हाड, चाकू, लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याच्या मित्राला पिस्तुलाचा धाक दाखवून पळवून लावल्याचा आरोप आहे.
समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी वारंवार परत येऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंगेशला निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहेत.
या प्रकरणात सचिन राठोड, अरबाज शेख आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनेला एक महिना उलटूनही आरोपी अटकेबाहेर असल्याचा आरोप पीडिताच्या आईने केला असून त्यांनी थेट बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.