मन मोकळं करायचंय? मुंबईत तरुण घेतो ऐकण्यासाठी पैसे!

Rokhthok Maharashtra 2 0

“आजच्या धावपळीच्या जगात लोकांकडे पैसा आहे, करिअर आहे, पण मन मोकळं करून बोलण्यासाठी माणूस नाही…

म्हणूनच मुंबईच्या जुहू बीचवर पृथ्वीराज बोहरा नावाच्या तरुणाने एक अनोखा व्यवसाय सुरू केला आहे.

त्याच्या फलकावर स्पष्ट दर लिहिलेले आहेत…

छोटी समस्या ऐकण्यासाठी २५० रुपये…

मोठी चिंता ऐकण्यासाठी ५०० रुपये…

आणि फक्त बसून रडून मन मोकळं करायचं असेल तर १००० रुपये!

पृथ्वीराज सांगतो, लोकांना सल्ल्यापेक्षा जास्त गरज असते ती कोणीतरी शांतपणे त्यांचं ऐकून घेण्याची.

नातेसंबंध, करिअर, वैयक्तिक तणाव… अनेक जण त्याच्याकडे येऊन आपल्या भावना व्यक्त करतात.

काहींनी या उपक्रमाचं कौतुक केलं, तर काहींनी भावनिक संवादासाठी पैसे घेण्यावर प्रश्न उपस्थित केले.

पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली…

डिजिटल युगातही लोकांना सर्वात जास्त गरज असते ती समजून घेणाऱ्या आणि ऐकून घेणाऱ्या माणसाची.”

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.