महाराष्ट्रात राजकीय भूकंप? बच्चू कडूंचा ‘प्रहार’ शिवसेनेत विलीन होणार?

Rokhthok Maharashtra 10 0

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार का? अशी चर्चा सध्या जोरात रंगली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एका पक्षाला थेट विलिनीकरणाची ऑफर दिल्याची माहिती समोर येतेय.
हा पक्ष म्हणजे बच्चू कडू यांचा ‘प्रहार’! सूत्रांच्या माहितीनुसार, विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्याच्या बदल्यात प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवण्यात आली आहे.
१९ एप्रिल रोजी मुंबई येथे शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात महत्त्वाची बैठकही झाली. या बैठकीत विधान परिषद आणि पुढील राजकीय समीकरणांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान, या घडामोडींमुळे भाजपमध्येही अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. अमरावती आणि विदर्भात बच्चू कडूंचा प्रभाव लक्षात घेता शिवसेनेला मोठा फायदा होऊ शकतो.
मात्र, बच्चू कडू यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. “कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जर हा निर्णय झाला, तर महाराष्ट्रात एका पक्षाचं अस्तित्व संपून मोठं राजकीय समीकरण बदलू शकतं

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.