“मी काय खरात आहे का?” भुजबळांचा मुंडेंवर टोला! राजकारणात खळबळ…..

Rokhthok Maharashtra 1 0

राजकीय वर्तुळात सध्या चर्चेत असलेल्या धनंजय मुंडे यांच्या पुनरागमनाबाबत मोठं वक्तव्य समोर आलं आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनावर भाष्य करत चिमटा काढला आहे.
“धनंजय मुंडे मंत्रिमंडळात येणार की नाही, हे सांगायला मी काही खरात आहे का?” असं वक्तव्य करत त्यांनी लक्ष वेधलं.

भुजबळ म्हणाले की, मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं हा पूर्णपणे मुख्यमंत्री यांचा अधिकार आहे.
तसंच, आमच्या पक्षातून कोण मंत्री होईल हे सुनेत्रा पवार ठरवतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

धनंजय मुंडे यांनी याआधी बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
आता ते पुन्हा मंत्रिमंडळात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, “श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. अशा घटना दुर्दैवी आहेत आणि सत्य कधी ना कधी बाहेर येतंच.”

तसंच, “ज्याला स्वतःच भविष्य कळलं नाही तो दुसऱ्याचं काय सांगणार?” असा टोला देखील त्यांनी लगावला.

खरातबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, “त्याचं नाव ऐकलं होतं, पण मी कधीच त्याच्याकडे गेलो नाही.”

या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.